एप्रिल-मे महिन्यात केंद्रात मोठा राजकीय भूकंप? खासदाराच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ


मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रासह राज्यांमधून भाजपचे सरकार जाणार असल्याचा दावा केला होता. भाजपचा परतीचा प्रवास सुरू झाला असून, हे घडणारच असल्याचे त्यांनी म्हटले होते. राज ठाकरे यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही त्यांच्या दाव्याला समर्थन दिले आहे. एप्रिल-मे महिन्यात केंद्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडतील आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत, असा दावा राऊत यांनी केला आहे.

खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना केंद्र सरकारवर निशाणा साधला. सरकारमध्ये अस्वस्थता असून, सत्ताधाऱ्यांनी आता बोऱ्याबिस्तरा बांधण्याची तयारी केली पाहिजे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीही सरकारकडून शेवटची धडपड सुरू आहे. या सरकारला जावेच लागणार असून, एप्रिल आणि मे महिन्यापर्यंत देशात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान राहणार नाहीत, असे मी वारंवार सांगत आहे. माझ्या या दाव्याला वेगवेगळे आधार आहेत, असे राऊत म्हणाले.

‘मोदी मे महिन्यापर्यंतच खेचू शकतील’

एप्रिल-मे महिन्याचा उल्लेख सर्वप्रथम आपणच केला होता, असा दावाही संजय राऊत यांनी केला. दिल्लीत बसून राजकीय परिस्थितीचे जे आकलन केले जाते, त्यातून हा निष्कर्ष काढल्याचे त्यांनी सांगितले. मोदी मे महिन्यापर्यंत सरकार चालवू शकतील; मात्र त्यानंतर ते थकतील आणि त्यांना सत्तेतून जावे लागेल, असे राऊत म्हणाले.

‘राष्ट्रपतींचेही फोन टॅप होत असतील’

दरम्यान, राहुल गांधी यांचा फोन टॅप करण्यात आल्याच्या आरोपावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. या देशात कोणाचे फोन टॅप केले जात नाहीत, असा सवाल करत त्यांनी सरकारवर टीका केली. कदाचित राष्ट्रपतींचेही फोन टॅप केले जात असतील. राजनाथ सिंह, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि योगी आदित्यनाथ यांचेही फोन टॅप होत असतील, असा दावा त्यांनी केला.

मोदी आणि अमित शाह यांच्यावर कोणाचाही विश्वास राहिलेला नाही. हुकूमशाही प्रवृत्तीचे लोक अशाच पद्धतीने वागत असतात. त्यामुळे आमचे फोन टॅप केले जात आहेत, तसेच लष्करी अधिकाऱ्यांचेही फोन टॅप होत असतील. राहुल गांधी यांचा फोन टॅप झाल्याचा आरोप ऐकून आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, असे सं

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!