ओडिशात रेल्वे अपघातात मृतांचा आकडा २२८ वर


ओडिशा : काल रेल्वे अपघाताबाबत एक मोठी घटना घडली. ओडिशातील बालासोर जिल्ह्यात भीषण रेल्वे अपघात झाला. यामुळे एकच खळबळ उडाली. येथे बहनगा रेल्वे स्थानकाजवळ तीन गाड्या एकमेकांवर धडकल्या.

 

या झालेल्या भीषण रेल्वे अपघातात मृतांची संख्या २८८ वर पोहोचली आहे. त्याच वेळी सुमारे ८५० लोक जखमी झाले आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ओडिशात जाणार आहेत.

 

तत्पूर्वी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीही घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असून, बचाव कार्यात लष्करही तैनात करण्यात आले आहे. भारतीय लष्कराचे कर्नल एसके दत्ता यांनी सांगितले की, लष्कर काल रात्रीपासून मदत आणि बचावकार्य करत आहे.

 

हावडा- बेंगळुरू एक्स्प्रेसचे अनेक डबे संध्याकाळी ७ वाजता रुळावरून घसरले. हे बडे ओडिशातील बहंगाबाजार येथे लगतच्या ट्रॅकवर पडले. १२८४१ शालीमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस त्या रुळावर आली आणि उलटलेल्या डब्यांशी धडकली.

 

यामुळे कोरोमंडलचे अनेक डबे रुळावरून घसरले आणि लगतच्या रुळावरून जाणाऱ्या मालगाडीला धडकले. स्थानिक लोकांनी प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. नंतर एन.डी.आर.एफ. राज्य सरकार आणि लष्कराने मदतकार्य सुरू केले.

 

या घटनेमुळे राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!