पुणेकरांना महागाईचा आणखी एक झटका! मध्यरात्रीपासून CNG-PNG महागले; जाणून घ्या नवे दर


पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवडसह चाकण, तळेगाव आणि हिंजवडी परिसरातील नागरिकांना आता CNG आणि PNG साठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (MNGL) गॅसच्या दरात वाढ जाहीर केली असून, १२ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून नवीन दर लागू झाले आहेत.

वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या CNG च्या दरात प्रतिकिलो १ रुपये २५ पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यात CNG चा दर ९७ रुपये ७५ पैशांवरून ९९ रुपये प्रतिकिलो झाला आहे. या दरवाढीचा थेट परिणाम वाहनचालकांच्या इंधन खर्चावर होणार आहे.

दुसरीकडे, घरगुती वापरासाठीच्या पाइप्ड नॅचरल गॅसच्या (PNG) दरातही वाढ झाली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात PNG च्या दरात प्रतिस्टँडर्ड क्युबिक मीटर (SCM) १ रुपये ५० पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन दर ५३ रुपये प्रतिएससीएम झाला आहे.

या दरवाढीमुळे वाहनचालकांसह घरगुती गॅस ग्राहकांनाही महागाईचा फटका बसणार आहे. दरम्यान, १३ नोव्हेंबर २०२६ रोजी महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये CNG आणि PNG चे दर किती आहेत, याची माहिती जाणून घेऊया.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील CNG चे दर

मुंबई आणि उपनगरे : ₹९०.००

पुणे आणि पिंपरी-चिंचवड : ₹९९.०० ते ₹९९.७५

नाशिक : ₹९९.७५

महाराष्ट्रातील इतर शहरांतील CNG दर

अहमदनगर : ₹१०५.३६, अकोला : ₹११०.४८, अमरावती : ₹११०.७३, छत्रपती संभाजीनगर : ₹१०५.३६, बीड : ₹१०१.६०, भंडारा : ₹१०७.४३, बुलढाणा : ₹११०.७३, चंद्रपूर : ₹१०६.००, धुळे : ₹९३.६५, गडचिरोली : ₹१०७.४३, गोंदिया : ₹१०७.४३, हिंगोली : ₹११०.४८, जळगाव : ₹९९.६०, जालना : ₹९९.६०, कोल्हापूर : ₹९६.९५, लातूर : ₹९४.००, नागपूर : ₹८८.९०, नांदेड : ₹९६.००, नंदुरबार : ₹१०८.०९, नवी मुंबई : ₹११०.७३, धाराशिव : ₹९४.००, पालघर : ₹८५.७५, परभणी : ₹९०.६५, रायगड : ₹९९.५२, रत्नागिरी : ₹९४.००, सांगली : ₹१०५.३६, सातारा : ₹१०५.३६, सिंधुदुर्ग : ₹९१.००, सोलापूर : ₹१०५.००, ठाणे : ₹८५.७५, वर्धा : ₹१०६.००, वाशिम : ₹११०.४८ आणि यवतमाळ : ₹११०.७३.

टीप : सर्व दर प्रतिकिलो रुपयांमध्ये आहेत.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील घरगुती PNG चे दर

मुंबई आणि उपनगरे : ₹५२.००

ठाणे आणि नवी मुंबई : ₹५२.००

पुणे आणि पिंपरी-चिंचवड : ₹५१.७५ ते ₹५३.००

नाशिक : ₹५१.७५

महाराष्ट्रातील इतर शहरांतील PNG दर

अहमदनगर : ₹५०.५०, अकोला : ₹५१.४०, अमरावती : ₹५१.४०, छत्रपती संभाजीनगर : ₹५०.५०, भंडारा : ₹५१.४०, गोंदिया : ₹५१.४०, हिंगोली : ₹५१.४०, कोल्हापूर : ₹५१.५०, लातूर : ₹४६.००, नागपूर : ₹४९.९०, नंदुरबार : ₹४८.३१, धाराशिव : ₹४६.००, पालघर : ₹५०.८७, रायगड : ₹५२.००, रत्नागिरी : ₹४६.००, सांगली : ₹५०.५०, सातारा : ₹५०.५०, सिंधुदुर्ग : ₹४९.२५, सोलापूर : ₹५०.५०, वाशिम : ₹५१.४० आणि यवतमाळ : ₹५१.४०.

टीप : PNG चे सर्व दर प्रतिस्टँडर्ड क्युबिक मीटर (SCM) प्रमाणे आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!