सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे; उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची वर्णी; सुनेत्रा पवार यांचा अनुभवी नेतृत्वावर विश्वास…

बारामती : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड जाहीर झाली आहे. अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे यांची, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची निवड करण्यात आली आहे.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या नेतृत्वाची धुरा आता राजवर्धन शिंदे आणि संग्राम सोरटे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. या निवडीमुळे कारखान्याच्या सभासदांसह सहकार क्षेत्रातील राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे.
कारखान्याच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी कोणाची निवड होणार, याकडे अनेक दिवसांपासून सभासदांचे लक्ष लागले होते. अखेर या निवडीचा निर्णय स्पष्ट झाला असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजवर्धन शिंदे अनुभवी शिलेदारावर विश्वास व्यक्त करीत राजवर्धन शिंदे अध्यक्षपदी, तर संग्राम सोरटे उपाध्यक्षपदी निवड केली आहे.
