लग्नास नकार दिला म्हणून प्रियकराने प्रेयसीच्या बहिणीला पाठवले ‘ते’ फोटो, दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


पुणे : पिंपरी- चिंचवडमध्ये लग्नास नकार देणाऱ्या प्रेयसीचे न्यूड फोटो तिच्या बहिणीला पाठवून मुलीची बदनामी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी प्रियकराच्या विरोधात दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहित कांतीलाल भोसले असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, प्रियकर रोहित आणि पीडित प्रेयसी एकत्र राहायचे. रोहित प्रेयसीकडे लग्नासाठी तगादा लावत होता. या यालाच कंटाळून प्रेयसी त्याच्यापासून विभक्त झाली. प्रेयसीने पुन्हा एकत्र राहण्यास नकार दिला.

त्यानंतर रोहितने फिर्यादी प्रेयसी पुन्हा सोबत राहावी यासाठी तिचा पाठलाग करत होता. तिला शिवीगाळ करायचा, काही वेळा प्रेयसीला मारहाण देखील केली. अखेर प्रेयसीची बदनामी करण्याच्या उद्देशाने तिचे न्यूड फोटो तिच्या बहिणीच्या व्हाट्सअप नंबर वर पाठवले.

दरम्यान, याप्रकरणी प्रेयसीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपी प्रियकर रोहित चा शोध पोलीस घेत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!