सणासुदीच्या तोंडावर CNG महागला; पुणेकरांच्या खिशाला झळ, पाहा नवीन दर…


पुणे : पुणेकरांच्या खिशाला पुन्हा एकदा झळ बसणार आहे. पुण्यात सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. टोरंट गॅसकडून करण्यात आलेली ही दरवाढ 7 ऑक्टोबर 2026 पासून लागू झाली आहे. त्यामुळे सीएनजी वाहनधारकांच्या इंधन खर्चात आणखी वाढ होणार आहे.

यापूर्वी पुण्यात टोरंट गॅसचा सीएनजी दर 98.50 रुपये प्रति किलो होता. आता त्यात 2 रुपयांची वाढ करण्यात आल्याने नवीन दर 100.50 रुपये प्रति किलो झाला आहे. पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपरेल यांनी या दरवाढीची माहिती दिली. वाढीव दर 7 ऑक्टोबर रोजी रात्री 12.01 वाजल्यापासून लागू करण्यात आला.

रिक्षा, कॅब चालकांसह खासगी वाहनधारकांना फटका

सीएनजीच्या दरवाढीचा थेट परिणाम सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांवर होणार आहे. रिक्षा, कॅब तसेच खासगी सीएनजी कार वापरणाऱ्या वाहनधारकांना आता प्रत्येक किलोमागे 2 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. त्यामुळे दररोज सीएनजी भरणाऱ्या वाहनधारकांच्या मासिक इंधन खर्चातही वाढ होण्याची शक्यता आहे.

सीएनजी शंभरीपार

या दरवाढीनंतर पुण्यात सीएनजीचा दर 100 रुपये 50 पैसे प्रति किलो झाला आहे. म्हणजेच पुण्यात सीएनजीने आता 100 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. अचानक झालेल्या या दरवाढीमुळे आधीच वाढत्या खर्चाचा सामना करणाऱ्या वाहनधारकांच्या बजेटवर अतिरिक्त भार पडणार आहे.

दरम्यान, ही दरवाढ टोरंट गॅसच्या वितरण नेटवर्कअंतर्गत येणाऱ्या पुणे ग्रामीण भागातील ग्राहकांनाही लागू होणार असल्याचे वृत्त आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!