सोने खरेदी दरात घसरणीला वेग, खरेदी करण्याची मोठी संधी, जाणून घ्या आजचे दर…

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या खरेदी दरात मोठ्या प्रमाणावर सातत्याने घसरण होत आहे. यामुळे गुंतवणूकदार तसेच खरेदीदार यांना देखील नेमकं खरेदी करावी की नाही असा प्रश्न पडला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोने खरेदी करू नका असे आवाहन केले होते.
त्यानंतर दरात देखील मोठ्या प्रमाणावर घसरन सुरूच आहे. यामुळे नेमकं करायचं काय असा प्रश्न अनेकांच्या पुढे आला आहे. तसेच येणाऱ्या काळात देखील सोन्याच्या दारात मोठे प्रमाणात घसरण होईल असा अंदाज देखील अनेक तज्ञांनी लावला आहे. अशातच आजचे सोन्याचे दर समोर आले आहेत.

मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1 लाख 26 हजार 570 आहे. तसेच 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1 लाख 16 हजार 20 रूपये आहे. 18 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 94 हजार 930 आहे. सोने आणि चांदीच्या किंमती मागील काही दिवसांपासून कोसळताना दिसल्या. आता पुन्हा सोन्याच्या भावात मोठा फेरबदल झाल्याचे बघायला मिळत आहे.

सोने 2 लाखाच्या आसपास गेल्यानंतर भविष्यात सोन्याचा दर कमी न होण्याचा अंदाज होता. त्यातच अचानक सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली. सोने पार 1 लाख 24 हजारांपर्यंत पोहोचले. सोन्याचा दर 1 लाखाच्या आत जाण्याचा अंदाज आहे. यामुळे येणाऱ्या काळात यामध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, अनेकांनी सोन्याचे दर वाढत आहेत म्हणून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली होती. आता हे दर कमी होत असल्याने अनेकांची निराशा झाली आहे. यामुळे येणाऱ्या काळात अजून यामध्ये काय बदल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून जागतिक पातळीवर बाजारात देखील यामध्ये बदल दिसून येत आहेत.
