पुण्यात आगीचे सत्र सुरुच; मार्केटयार्डातील गोदामात भीषण आग

पुणे : पुण्यातील आगीचे सत्र सुरुच आहे. दोनदिवसांपूर्वी टिंबरमार्केट येथे आग लागल्याची घटना घडली. त्यानंतर आता मार्केटयार्डातील गोदामात आग लागल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी नाही.
मिळालेल्या माहिती नुसार, काल मध्यराञी ०१•०५ वाजता अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मार्केटयार्ड, गोल मार्केट येथील एका गोडाऊनमधे भीषण आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले.
गोडाऊनमधे कागद रद्दी व काही प्रमाणात पुठ्ठा असणाऱ्या मालाला मोठ्या प्रमाणात आग लागली आहे. जवानांनी तातडीने गोडाऊनचा मुख्य दरवाजाचे बोल्ड कटरच्या साह्याने कुलुप तोडत चोहोबाजूंनी पाण्याचा मारा सुरू करून आतमधे कोणी कामगार अथवा नागरिक अडकला नाही ना याची ही खाञी केली.
आग मोठी असल्याने जवानांनी अतिरिक्त मदत अग्निशमन वाहनांना पाचारण केले. तसेच शेजारीच रहिवाशी इमारत असल्याने आग त्या दिशैला पसरु नये याची विषेश खबरदारी घेत पाण्याचा मारा सुरू ठेवत सुमारे तासाभरात आग आटोक्यात आणली.
यावेळी गोडाऊनमधे असलेले रद्दीचे कागद पुर्णपणे जळाले.घटनास्थळी गोडाऊनमधे असलेले दोन टेम्पो ही जळाले. नुकसान व आगीचे कारण समजू शकले नाही. घटनास्थळी कोणी जखमी नाही.