सूरज चव्हाण झाला बाबा! घरी आली चिमुकली परी; ‘गुलिगत स्टार’वर शुभेच्छांचा वर्षाव


पुणे : ‘बिग बॉस मराठी 5’चा विजेता सूरज चव्हाण बाबा झाला आहे. जन्माष्टमीच्या दिवशी सूरज आणि संजना यांच्या आयुष्यात चिमुकल्या परीचं आगमन झालं असून, त्यांना कन्यारत्न प्राप्त झालं आहे. लेकीच्या जन्माने संपूर्ण कुटुंबात आनंदाचं वातावरण असून चाहत्यांकडूनही सूरजवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सूरज चव्हाण आणि संजना यांचं डिसेंबर 2025 मध्ये लग्न झालं होतं. त्यानंतर काही महिन्यांनी दोघेही आई-बाबा होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने संजनाच्या ‘चोर ओटी’चा व्हिडीओ शेअर केल्यानंतर या चर्चांना आणखी उधाण आलं होतं.

यानंतर सूरज आणि संजना यांनी स्वतः चाहत्यांसोबत ही गोड बातमी शेअर केली. संजनाने बेबी बंपसह काही व्हिडीओ आणि फोटोही शेअर केले होते. काही दिवसांपूर्वी तिचं थाटामाटात डोहाळे जेवणही पार पडलं. या कार्यक्रमाचं आयोजन अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने केलं होतं.

लेकीला पाहण्यासाठी सूरजची रुग्णालयात धाव

आता लग्नानंतर काही महिन्यांनी सूरज आणि संजना यांच्या आयुष्यात हा आनंदाचा क्षण आला आहे. लेकीच्या जन्मानंतर सूरजचा रुग्णालयातील पहिला व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

सूरजच्या एका चाहत्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून तो सध्या चर्चेत आहे. रुग्णालयात सूरज आणि संजनाच्या बाळाला पाहण्यासाठी चाहत्यांची आणि स्टाफची गर्दी झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

या गर्दीतून वाट काढत सूरज संजनाला आणि आपल्या नवजात लेकीला भेटताना दिसत आहे. त्याने संजनाच्या डोक्यावरून हात फिरवत तिची विचारपूस केली. या क्षणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लेकीच्या आगमनाने सूरजचा आनंद गगनात मावेनासा झाला असून, चाहत्यांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!