किशोर आवारे हत्या प्रकरणात मोठी माहिती आली समोर, एसआयटी प्रमुखांच्या बदलीबाबत मोठा निर्णय

पुणे : पुण्यात काही दिवसांपूर्वी तळेगावमधील जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची हत्या करण्यात आली होती. याबाबत पोलीस तपास करत आहेत. असे असताना राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यामध्ये उपअधीक्षक आणि सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात पिंपरी चिंचवडच्या सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांचा समावेश होता. यामुळे आता या प्रकरणी तपास कसा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
असे असताना आता प्रेरणा कट्टे यांची चंद्रपूरला झालेली बदली रद्द करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास त्यांच्यांकडे राहणार आहे. यामुळे या तपासाचा वेग कायम राहणार आहे.

या प्रकरणातील फरार आरोपी माजी नगरसेवक भानू खळदे याला अटक करण्यासाठी पोलीस वेगाने प्रयत्न करणार आहे. अटक झाल्यानंतर तपासाला गती मिळणार आहे. याबाबत पोलिस तपास करत आहेत.
