रील बनवणं जीवावर, परभणीत चार विद्यार्थ्यांचा थरारक अपघात, एकाचा मृत्यू…!

परभणी : सध्या मोबाईलच्या जमान्यात त्याचे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटे देखील आहेत. आता मोबाईलवर रील बनवताना अपघात घडल्याने खळबळ उडाली आहे. एकाच गाडीवर जाणाऱ्या चार विद्यार्थ्यांचा रील तयार करताना अपघात झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.

हे विद्यार्थी परभणीमध्ये झेंडावंदनला एकाच गाडीवर जात होते. मेला या चित्रपटातील डर है तुझे किस बात का? या गाण्यावर विद्यार्थी रील तयार करत होते. यामुळे त्यांचे लक्ष विचलित झाले. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
यामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. यामध्ये जो गाडी चालवतोय तो स्वप्नील चव्हाण असून त्याचा हा अपघातात एक हात तुटला आहे. तर शंतनू सोनवणे या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.

इतर विद्यार्थ्यांवर अंबाजोगाईच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर या 4 जणांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात हे चार जण शाळेकडे जात असताना पाथरी सोनपेठ मार्गावर रील बनवत होते.
दरम्यान हा व्हिडीओ अपघातापूर्वी काही वेळ अगोदरचा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. यामुळे अशा प्रकारे मोबाईल हाताळत असताना काळजी घेणे गरजेचे आहे.