Pune News : ६ वर्षांच्या मुलाला घरी बोलवायचा तरुण, मग करायचा धक्कादायक प्रकार; सत्य समोर येताच आई-वडील हादरले

पुणे : पिंपरी-चिंचवड परिसरातून संतापजनक घटना समोर आली आहे. आळंदी (ता. खेड) येथे एका १९ वर्षीय तरुणाने सहा वर्षांच्या अल्पवयीन मुलाला घरात बोलावून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
जुलै महिन्यापासून ८ ऑगस्टपर्यंत हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. मुलाने आरडाओरड केला असता नराधमाने त्याचे तोंड दाबून घडलेल्या प्रकाराबाबत कोणाला सांगिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, आळंदी येथील एका १९ वर्षीय तरुणाने ६ वर्षांच्या अल्पवयीन मुलाला फूस लावून आपल्या घरात बोलावले. जुलै महिन्यापासून ते ८ ऑगस्ट या कालावधीत त्याने मुलावर लैंगिक अत्याचार केले. पीडित चिमुकल्याने या अत्याचाराला विरोध करत आरडाओरड केली असता आरोपीने जबरदस्तीने त्याचे तोंड दाबून ठेवले आणि पोलिसांत किंवा कोणाकडे तक्रार केल्यास थेट मारून टाकण्याची धमकी दिली.


वडिलांच्या तक्रारीनंतर पोलीस ॲक्शन मोडमध्ये
अखेर सततच्या त्रासाला कंटाळून मुलाने घडलेला सर्व प्रकार कुटुंबाला सांगितल्यानंतर, पीडित अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी तत्काळ दिघी पोलीस ठाण्यात धाव घेऊन बुधवारी (१२ ऑगस्ट) तक्रार नोंदवली.
याप्रकरणी पोलिसांनी १९ वर्षीय आरोपी तरुणावर बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यानुसार (POCSO) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आळंदी पोलिसांकडून वेगाने सुरू असून, संशयित नराधमाला कडक कायदेशीर कारवाई सामोरे जावे लागणार आहे.