ऑस्ट्रेलियात मोदींच्या स्वागतासाठी हवेतच लिहिलं वेलकम मोदी! स्वागत बघून मोदीही भारावले.

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून त्यांचे जंगी स्वागत ऑस्ट्रेलियाकडून करण्यात आले आहे. हवेत welcome modi अशी अक्षरे लिहिले असून यासंबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
#WATCH ऑस्ट्रेलिया: सिडनी में सामुदायिक कार्यक्रम से पहले एक मनोरंजक विमान के कॉन्ट्रेल्स द्वारा वेलकम मोदी लिखा गया। pic.twitter.com/M5bsGBRBWp
— ANI_HindiNews (@AHindinews) May 23, 2023

तसेच व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हवेत पांढऱ्या रंगाचे काही इंग्रजी रंगाचे अक्षर दिसत असून त्यावर वेलकम मोदी असं लिहिलं आहे. त्याचबरोबर याआधी मोदींच्या आगमनानंतर त्यांचे चरणस्पर्श केल्याचेही व्हिडिओ समोर आले होते.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही दिवसांपासून विदेशी दौऱ्यावर आहेत. यावेळी अनेक देशांच्या प्रतिनिधी आणि नेत्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. तर त्यांना सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फिजी आणि पापुआ न्यू गिनी देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने नुकतंच सन्मानित करण्यात आले आहे.
