लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज! जुलैच्या हप्त्याबाबत सरकारचा मोठा निर्णय समोर


पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारने जुलै 2026 च्या हप्त्याच्या वितरणासाठी 319.53 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय 12 ऑगस्ट 2026 रोजी जारी करण्यात आला आहे.

त्यामुळे पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जुलै महिन्याच्या हप्त्याची रक्कम लवकरच जमा होण्याची शक्यता आहे.

जुलैच्या हप्त्यासाठी 319.53 कोटींची तरतूद

महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील लाखो महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. मात्र, जुलै 2026 चा हप्ता अद्याप खात्यात जमा न झाल्याने लाभार्थी महिलांकडून त्याची प्रतीक्षा केली जात होती.

आता महिला व बाल विकास विभागाने हप्त्याच्या वितरणासाठी निधीची प्रक्रिया पुढे नेली आहे. वित्त विभागाच्या मंजुरीनंतर पात्र महिलांना जुलै महिन्याचा लाभ देण्यासाठी 319.53 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

हा निधी महिला व बाल विकास विभागाच्या सचिवांकडे वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, याबाबतचा शासन निर्णय 12 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.

पात्र महिलांच्या खात्यात कधी जमा होणार पैसे?

सरकारकडून निधी वितरणाची प्रक्रिया पुढे गेल्याने आता पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत जुलैचा हप्ता खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

या योजनेअंतर्गत सर्वसाधारण पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात. तर पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या पात्र महिलांना 500 रुपये दिले जातात.

80 लाख महिलांचा लाभ बंद

दरम्यान, योजनेतील लाभार्थी निश्चित करण्यासाठी अर्जांची छाननी आणि ई-केवायसी प्रक्रिया करण्यात आली. या प्रक्रियेत आवश्यक कागदपत्रांचा अभाव, आधारशी बँक खाते लिंक नसणे, ई-केवायसी पूर्ण न करणे तसेच पात्रता निकषांची पूर्तता न करणे अशा त्रुटी आढळल्या.

या तपासणीनंतर सुमारे 80 लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले असून त्यांचा योजनेतील लाभ बंद करण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!