पश्चिम बंगालमध्ये ९१ लाख मतदारांची नावे वगळली, आता महाराष्ट्रातही तोच पॅटर्न? रोहित पवारांचा धक्कादायक खुलासा..

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात निवडणूक आयोगाकडून मतदारांच्या बोगस मताबाबत मोहीम सुरू आहे. यावर मात्र आमदार रोहित पवार यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. कोणतीही निवडणूक तोंडावर नसतानाही महाराष्ट्रात ‘SIR’ मोहीम एवढ्या घाईघाईत का राबवली जातेय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
केवळ ४ दिवस उरले असताना १८% मतदारांची प्रपत्रे अद्याप जमा झालेली नाहीत. पश्चिम बंगालमध्येही १२% (९१ लाख) मतदारांची नावे वगळून लोकशाहीचा ज्याप्रमाणे गळा घोटला तोच बंगाल पॅटर्न महाराष्ट्रात राबवून मतदारांचा हक्क हिरावून घेतला जातोय.

यातून सत्तेचा मार्ग सोपा करण्याचा राजकीय कट सरकारकडून रचला जातोय का? अशी शंका यामुळं निर्माण होते. पुरेशी संधी आणि वेळ दिल्याशिवाय कोणत्याही मतदाराला लोकशाहीने दिलेला मतदानाचा पवित्र हक्क हिरावून घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगासह कुणालाच नाही. असेही ते म्हणाले.


सरकार पुरस्कृत हा कट आम्हीही कदापि यशस्वी होऊ देणार नाही. मतदारांना प्रपत्रे जमा करण्यासाठी निवडणूक आयोगाने तातडीने वेळ वाढवून द्यावा, प्रसंगी स्वतःच्या यंत्रणेमार्फतही खात्री करावी. यातून यंत्रणा काम करेल आणि सर्वांना लोकशाही मार्गाने मतदानाचा हक्क मिळेल.
तसेच रोहित पवार म्हणाले, याबाबतच चर्चा करण्यासाठीच वेळ देण्याची विनंती आम्ही निवडणूक आयोगाला केली, परंतु अद्यापही वेळ देण्यात आलेली नाही, आम्ही अजूनही वाट पहात आहोत, असेही ते म्हणाले. यामुळे आयोग काय भूमिका घेणार हे लवकरच समजेल.