पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! गणेशोत्सवात कोकणासाठी धावणार 10 विशेष ट्रेन; मध्य रेल्वेचं वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या


पुणे : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने मोठी घोषणा केली आहे. सणासुदीच्या काळात होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पुणे ते रत्नागिरीदरम्यान 10 विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे यंदा कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या एकूण 246 विशेष गाड्यांपैकी पुणे-रत्नागिरी मार्गावर 4 पूर्ण वातानुकूलित (AC) आणि 6 मिश्र (AC, स्लीपर आणि जनरल डबे) अशा 10 गाड्या धावणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसह आरक्षित तिकीट मिळवणाऱ्यांनाही मोठा फायदा होणार आहे.

पुणे-रत्नागिरी विशेष गाड्यांचे वेळापत्रक

1) गाडी क्रमांक 01445/01446 (पूर्ण AC साप्ताहिक विशेष)

धावणार : 15 आणि 22 सप्टेंबर
पुणे प्रस्थान : रात्री 12:25
रत्नागिरी आगमन : सकाळी 11:50
परतीचा प्रवास : रत्नागिरीहून सायंकाळी 5:50, पुण्यात दुसऱ्या दिवशी सकाळी 5:20

2) गाडी क्रमांक 01447/01448 (मिश्र साप्ताहिक विशेष)

धावणार : 12, 19 आणि 26 सप्टेंबर
वेळ : AC विशेष गाड्यांप्रमाणेच

या गाड्या पुणे, चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड मार्गे रत्नागिरी येथे पोहोचतील.

याशिवाय CSMT आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथूनही रत्नागिरी, सावंतवाडी रोड आणि मडगावसाठी विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या या 246 विशेष गाड्यांमध्ये 184 आरक्षित मिश्र गाड्या आणि 62 अनारक्षित गाड्यांचा समावेश आहे.

या विशेष गाड्यांमुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या पुणेकरांचा प्रवास अधिक सोयीस्कर होण्याबरोबरच कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यताही वाढणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!