सणाआधी ग्राहकांना मोठा दिलासा! सोन्याचे दर घसरले; जाणून घ्या आज 1 तोळा सोन्यासाठी किती मोजावे लागणार?

पुणे : आता काही दिवसांतच सणासुदीची धामधूम सुरू होणार असून दागिन्यांच्या खरेदीलाही वेग येणार आहे. अशातच सोने-चांदी खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गुरुवार (30 जुलै) रोजी देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्याच्या दरात किंचित घसरण झाली असून चांदीच्या किमतीतही घट झाली आहे.
भारतीय रुपया मजबूत झाल्याचा परिणाम देशांतर्गत सराफा बाजारावर दिसून आला आहे. रुपया मजबूत झाल्याने परदेशातून सोने आयात करण्याचा खर्च कमी होतो आणि त्याचा फायदा किरकोळ ग्राहकांनाही मिळतो. त्यामुळे सोन्याच्या किमतीत काहीशी नरमाई पाहायला मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. स्पॉट गोल्डचा दर 4,080.38 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचला असून यूएस गोल्ड फ्युचर्सही 4,078 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहेत. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने जुलैच्या बैठकीत व्याजदर 3.50 ते 3.75 टक्क्यांदरम्यान कायम ठेवले आहेत. व्याजदर स्थिर राहिल्याने मौल्यवान धातूंना सकारात्मक आधार मिळत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.


आजचे सोन्याचे दर (30 जुलै 2026)
दिल्ली
22 कॅरेट : ₹1,32,990 प्रति 10 ग्रॅम
24 कॅरेट : ₹1,43,650 प्रति 10 ग्रॅम
मुंबई
22 कॅरेट : ₹1,31,540 प्रति 10 ग्रॅम
24 कॅरेट : ₹1,43,500 प्रति 10 ग्रॅम
अहमदाबाद
22 कॅरेट : ₹1,31,590 प्रति 10 ग्रॅम
24 कॅरेट : ₹1,43,550 प्रति 10 ग्रॅम
चेन्नई
22 कॅरेट : ₹1,31,540 प्रति 10 ग्रॅम
24 कॅरेट : ₹1,43,500 प्रति 10 ग्रॅम
कोलकाता
22 कॅरेट : ₹1,31,540 प्रति 10 ग्रॅम
24 कॅरेट : ₹1,43,500 प्रति 10 ग्रॅम
हैदराबाद
22 कॅरेट : ₹1,31,540 प्रति 10 ग्रॅम
24 कॅरेट : ₹1,43,500 प्रति 10 ग्रॅम
जयपूर
22 कॅरेट : ₹1,31,690 प्रति 10 ग्रॅम
24 कॅरेट : ₹1,43,650 प्रति 10 ग्रॅम
भोपाळ
22 कॅरेट : ₹1,31,590 प्रति 10 ग्रॅम
24 कॅरेट : ₹1,43,550 प्रति 10 ग्रॅम
लखनऊ
22 कॅरेट : ₹1,31,690 प्रति 10 ग्रॅम
24 कॅरेट : ₹1,43,650 प्रति 10 ग्रॅम
चंदीगड
22 कॅरेट : ₹1,31,690 प्रति 10 ग्रॅम
24 कॅरेट : ₹1,43,650 प्रति 10 ग्रॅम
चांदीचाही दर घसरला
सोन्यासोबतच चांदी खरेदी करणाऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. देशांतर्गत बाजारात चांदीचा भाव घसरून 2,34,900 रुपये प्रति किलो झाला आहे. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सिल्व्हरची किंमत वाढून 58.20 डॉलर प्रति औंस झाली आहे.
सणासुदीच्या खरेदीपूर्वी दरात झालेली ही घसरण ग्राहकांसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता असून, पुढील काही दिवसांत जागतिक बाजारातील घडामोडी आणि रुपयाच्या हालचालींवर सोने-चांदीचे दर अवलंबून राहणार आहेत.