सिद्धरामय्यांनी दुसऱ्यांदा घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ ; काँग्रेसचं जोरदार शक्तिप्रदर्शन


कर्नाटक : कर्नाटकमध्ये आज नव्या सरकारची स्थापना झाली आहे. काँग्रेसचे कर्नाटकमधील वरिष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाची तर कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी उपसमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर आता पक्षाने राज्यात सरकार स्थापन केलं आहे.

काँग्रेसकडून मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचं औचित्य साधून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं आहे. या सोहळ्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियकां गांधी, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार,  काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, फारूख अब्दुला यांची उपस्थित होती. यानिमित्तानं देशभरातील विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, गुरुवारी झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाने औपचारिकरीत्या सिद्धरामय्या यांची नेता म्हणून निवड केली. त्यानंतर त्यांनी राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा केला होता. दरम्यान, आज (२० मे) बंगळुरुमधील कांतीरवा मैदानात हा शपथविधी सोहळा पार पडला. सिद्धरामय्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!