शेतकऱ्यांनो सावधान! कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर आधी करा ‘हे’ काम; अन्यथा होईल मोठं नुकसान


मुंबई : राज्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अ‍ॅग्रीस्टॅक मध्ये नोंदणी करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी विलंब न करता नोंदणी आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांची ओळख, शेतीचा तपशील आणि पीक कर्जाची माहिती एकाच डिजिटल प्रणालीत उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने अ‍ॅग्रीस्टॅक व्यवस्था सुरू केली आहे. नोंदणीसाठी आधार कार्ड, आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक, 7/12 उतारा, बँक खात्याची माहिती आणि पीक कर्जाचा तपशील आवश्यक आहे.

शेतकरी Farmer Registry पोर्टलवर जाऊन आधार पडताळणी, ओटीपी सत्यापन आणि शेतीची माहिती भरून नोंदणी पूर्ण करू शकतात. घरबसल्या ही प्रक्रिया करता येत असली तरी अडचण आल्यास जवळच्या सेवा केंद्राची मदत घेता येणार आहे.

या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कमाल 2 लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो. यासाठी 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत आणि 31 मार्च 2026 पर्यंत न फेडलेले पीक कर्ज विचारात घेतले जाणार आहे.

याशिवाय, 2022-23, 2023-24 आणि 2024-25 या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षांत वेळेवर पीक कर्ज फेडणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.

शासनाने स्पष्ट केले आहे की, अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणीसोबत ई-केवायसी पूर्ण करणेही आवश्यक आहे. चुकीची किंवा अपुरी माहिती भरल्यास कर्जमाफीचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लवकरात लवकर नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!