पुणे हादरलं! कॉलेजच्या तरुणीवर वर्षभर लैंगिक अत्याचार; अश्लील व्हिडिओच्या धमकीने चौघांकडून शोषण, सर्व आरोपींना बेड्या


पुणे : पुण्यातील महाविद्यालयीन तरुणीवर चार जणांनी तब्बल वर्षभर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी वारंवार अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. तिच्या तक्रारीनंतर वाघोली पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 वर्षीय पीडित तरुणी विमाननगर परिसरात राहते. 2025 मध्ये तिने पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. याच महाविद्यालयात आरोपी फरान शेख याच्याशी तिची ओळख झाली. पुढे मैत्री झाल्यानंतर आरोपीने तिचा विश्वास संपादन करून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

तक्रारीनुसार, फरान शेखसह फजल शेख, रेहान शेख आणि साहिल यांनी अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत गेल्या वर्षभरात विविध ठिकाणी पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार केले.

पीडितेच्या फिर्यादीवरून वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरान शेख, फजल शेख, रेहान शेख आणि साहिल या चौघांना अटक करण्यात आली आहे. सध्या चारही आरोपी पोलिस कोठडीत असून या प्रकरणाचा पुढील तपास वाघोली पोलीस करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!