जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे दौंडच्या सीमेवर जल्लोषात स्वागत.

यवत : जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे दौंडच्या सीमेवर दौंडचे आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा कांचन राहुल कुल , राष्ट्रवादी काँग्रेस विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी उत्साह, भक्ती आणि जल्लोषात स्वागत केले.

यावेळी दौंडचे प्रांत रेवणनाथ लबडे,तहसीलदार अरुण शेलार, दौंडचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे, यवतचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, सभापती सुखदेव चोरमले, मोहन म्हेत्रे , आप्पासाहेब पवार,जिल्हा परिषद सदस्य अविनाश कुदळे, पंचायत समिती सदस्या राजश्री सागर म्हस्के, राहुल हंडाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष नितिन दोरगे, रामभाऊ फुले, अजित शितोळे,ज्योती झुरंगे, शामल पवार सुशांत दरेकर, राजेंद्र तावरे, संदीप ताम्हाणे,अमोल म्हेत्रे, मुरलीधर भोसेकर, सुरेश दरेकर, प्रताप तावरे, नंदु म्हस्के, किसन म्हस्के, बाळासाहेब टेकवडे , बाळासाहेब म्हस्के, मंगेश भोसेकर, संदीप गायकवाड आदी ,कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुपारची न्याहरी आणि विश्रांती घेऊन पालखी सोहळा चारच्या दरम्यान दौंडच्या सीमेवर बोरीभडक येथे आगमन झाले. याठिकाणी स्वागत स्वीकारून व पाच मिनिटे याठिकाणी प्रथमच दर्शनासाठी थांबून पालखी पुढील मुक्कामी यवतकडे मार्गस्थ झाली.यादरम्यान कांचन कुल,आदीत्य कुल यवत पर्यंत पालखी सोहळ्यात सहभागी झाले.

बोरीभडक येथे स्वागतासाठी माजी सरपंच दशरथ कोळपे, कविता कोळपे,कैलास आतकिरे, विकास आतकिरे, उपसरपंच प्रवीण खेडेकर, योगेश काळे, चेअरमन आकाश गव्हाणे यांनी सर्वांचे स्वागत केले.

यवत मध्ये सर्व सोयी सुविधांसह बेसन भाकरी मोठ्या प्रमाणात बनवण्यात आली आहे.