तुकोबांच्या पालखी सोहळ्यात श्री विठ्ठल भक्तिचे उमटले प्रतिबिंब; पांडुरंगाच्या भेटीसाठी वैष्णवांचा मेळा ऐतिहासिक उरुळीकांचननगरीत विसावला …….


यावे माहेरास !
हेच सर्वकाळ आस !!
घ्यावी उच्छीष्टाची धणी !
तीर्थ इच्छी पायवणी !!

उरुळीकांचन : संत हे मायबाप आहेत, त्यांच्याकडे यावे, हीच आस मला सर्वकाळ आहे. या संत तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीशी श्री विठ्ठलाचा हृदयात साठविलेला महिमा अंतकर्णात सामाविष्ठ करीत हजारोंचा वैष्णवांचा मेळा तहान भुक हरवीत महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पुणीत झालेला मेळा ऐतिहासिक उरुळीकांचन
भूमित दुपारच्या विसाव्यासाठी एकरुप झाल्याचे भक्तिमय चित्र उरुळीकांचनकरांनी अनुभविले.

संत तुकाराम महाराज यांचा आषाढी एकादशीचा विठ्ठल भेटीचा मेळा उरुळीकांचन येथे भक्तिमय वातावरणात विसावला होता. संतश्रेष्ठांच्या पालखीचे दुपारच्या १ वाजण्याच्या सुमारास उरुळीकांचन येथे आगमन झाले. आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके , माजी आमदार अशोक पवार, पुणे बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप, संचालक राजाराम कांचन, अप्पर लोणीकाळभोर तहसीलदार तृप्ती कोलते, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन, ‘यशवंत’ चे संचालक संतोष कांचन, चक्रधर उद्योगसमूहाचे संजय कांचन, माजी सरपंच मयूर कांचन, डॉ. मणिभाई देसाई पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन, ग्रामविकास अधिकारी टी.एस.पाटील आदी मान्यवरांनी सोहळ्याचे उस्फुर्तपणे स्वागत केले.

पालखी सोहळा दिड वाजण्याच्या सुमारास भाविक भक्तांच्या दर्शनासाठी जर्मनमेड भव्य मंडपात दाखल झाला होता. भाविकांनी विठुरायाचा जयघोष करीत भक्तिचे एकरुप या दर्शनबारीत दाखविले. दरम्यान लोणीकाळभोर येथून विठ्ठल मंदिरातून रविवारी सकाळी तुकोबांच्या पादुकांचीविविवत आरती पार पडीत सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हा सोहळा यवत मुक्कामासाठी मार्गस्थ झाला. थेऊरफाट्यावर सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास दाखल झाला. हवेलीचे उपविभागीय महसूल अधिकारी डॉ. यशवंत माने, हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे, कुंजीरवाडीचे सरपंच सचिन तुपे, श्रीनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष संदिप धुमाळ आदींनी पालखीचे स्वागत केले.

नायगाव फाट्यावर हवेली पंचायत समितीचे सदस्य कृषीराज चौधरी यांनी पालखीचे स्वागत केले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, भाजप जिल्हा महिला अध्यक्षा पुनम चौधरी यांनी स्वागत केले. सोरतापवाडीफाट्यावर स्वागतास हवेली पंचायत समिती सदस्य सुदर्शन चौधरी, युवा नेते अमित चौधरी, माजी उपसरपंच राजेंद्र चौधरी, विजय चौधरी, विलास चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.  प्रयागधाम फाट्यावर कोरेगावमूळचे माजी सरपंच मंगेश कानकाटे, भानुदास जेधे, नानासाहेब शिंदे आदींनी पालखी सोहळ्याचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले.

दरम्यान साधारण साडेतीन वाजण्याच्या सुमारास पालखी सोहळा उरुळीकांचन येथील विसावा आपटून यवत मुक्कासाठी मार्गस्थ झाला. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पालखी सोहळ्याने हवेली तालुक्याची शिव ओलांडुन दौंड तालुक्यातील बोरीभडक येथे प्रवेश केला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!