अमरिंदर सिंग राज्याचे नवीन राज्यपाल ?

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वीच राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपालपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. या संदर्भात आता राजकीय वर्तुळात नवीन चर्चा सुरू झाली आहे.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात येणार असल्याची चर्चा रंगली आहे. पण याची अद्याप पुष्टी झाली नाही. भाजप नेतेही यावर भाष्य करण्यास तयार नाहीत.
महाराष्ट्राच्या राज्यपालपदासाठी आधी लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचे नाव चर्चेत होते. पण त्या मुंबईच्या असल्यामुळे त्यांचे नाव मागे पडले. आता अचानक काँग्रेसचे बंडखोर नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे नाव समोर आले आहे.

Views:
[jp_post_view]