मुंबईत पावसाचा महाअलर्ट! WFH, सरकारी कर्मचाऱ्यांना हाफ डे; पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे


मुंबई : राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसाठी रेड अलर्ट जारी करत पुढील काही तासांत अतिवृष्टीसह ताशी 80 ते 90 किमी वेगाने वारे वाहण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत खासगी कंपन्यांना कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना दुपारनंतर अर्धा दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह अनेक भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचले असून रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. काही ठिकाणी रेल्वे सेवा मंदावली असून प्रवाशांचे हाल होत आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दरड कोसळल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.

प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे, समुद्रकिनारे, धबधबे आणि पाणथळ भागांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, महापालिका, पोलीस आणि अन्य विभाग सतर्क असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. हवामानाचा अंदाज लक्षात घेता पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून नागरिकांनी केवळ अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!