पुण्यातील महिलेला मिळाला ‘धोका’; काही दिवसांची ओळख अन् तरुणावर डोळे झाकून ठेवला विश्वास, पुढे लाखोंचा बसला फटका


पुणे : पुण्यात स्वस्तात सोनं मिळवून देण्याच्या आमिषाने एका महिलेला लाखोंचा गंडा घालण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 32 वर्षीय महिलेची आणि आरोपी तेजस तानाजी मोहिते (रा. शाहूनगर, पिंपरी-चिंचवड) याची जानेवारी महिन्यात ओळख झाली होती. आरोपीने दुबईत ओळखीचे लोक असल्याचे सांगत बाजारभावापेक्षा कमी दरात सोनं मिळवून देण्याचे आमिष दाखवले.

महिलेचा विश्वास संपादन केल्यानंतर आरोपीने वेळोवेळी तिच्याकडून एकूण 6 लाख 59 हजार रुपये घेतले. मात्र, पैसे घेतल्यानंतर ना सोनं दिलं, ना रक्कम परत केली. याबाबत विचारणा केल्यानंतर आरोपी टाळाटाळ करू लागला.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तेजस मोहिते याला अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, कमी दरात सोनं, गुंतवणुकीवर मोठा परतावा किंवा झटपट नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!