जयंत पाटलांना मोठा धक्का! सांगली-साताऱ्यात भाजपची बाजी, धैर्यशील कदम दणदणीत विजयी..

सातारा : राज्याचं लक्ष लागलेल्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी शरद पवार गटाचे उमेदवार अभयसिंह जगताप यांचा 301 मतांच्या फरकाने पराभव केला.

मतमोजणीअंती धैर्यशील कदम यांना 593 मते मिळाली, तर अभयसिंह जगताप यांना 292 मते मिळाली. या निकालानंतर सांगली आणि सातारा जिल्ह्यांत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली आहे. हा निकाल प्रदेशातील राजकीय समीकरणांवर प्रभाव टाकणारा मानला जात आहे.
मतदानाची आकडेवारी

या निवडणुकीत एकूण 895 मतदारांपैकी 894 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी जवळपास 100 टक्के राहिली. मतमोजणीदरम्यान 9 मते अवैध ठरली. सांगली आणि सातारा जिल्ह्यातील 12 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली होती.

निकालाची आकडेवारी
धैर्यशील कदम (भाजप) – 593 मते
अभयसिंह जगताप (शरद पवार गट) – 292 मते
विजयाचा फरक – 301 मते
पक्षीय बलाबल काय होते?
निवडणुकीपूर्वी या मतदारसंघातील पक्षीय गणितांवर सर्वांचे लक्ष लागले होते.
महायुती
भाजप – 314
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – 205
शिवसेना (शिंदे गट) – 111
महाविकास आघाडी
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – 119
काँग्रेस – 73
शिवसेना (ठाकरे गट) – 1
निवडणुकीकडे का लागलं होतं लक्ष?
सांगली आणि साताऱ्यात भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील स्थानिक मतभेदांमुळे ही निवडणूक चुरशीची होणार असल्याची चर्चा होती. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही पक्षांमध्ये मोठा वाद झाला होता. त्यावेळी झालेल्या राजकीय घडामोडींमुळे महायुतीत अंतर्गत नाराजी असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांची भूमिका काय राहणार याकडेही सर्वांचे लक्ष होते. मात्र मतदान आणि निकालातून महायुतीत प्रभावी समन्वय दिसून आला. त्याचा फायदा भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांना झाला आणि त्यांनी मोठा विजय मिळवला.
राज्यातील 17 जागांचा निकाल
ठाणे – रवींद्र फाटक (शिवसेना) – बिनविरोध
यवतमाळ – दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना) – बिनविरोध
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग – अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस) – बिनविरोध
पुणे – विक्रम काकडे (राष्ट्रवादी काँग्रेस) – बिनविरोध
वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर – अरुण लखाणी (भाजप) – बिनविरोध
अहिल्यानगर – प्राजक्त तनपुरे (भाजप) – बिनविरोध
छत्रपती संभाजीनगर-जालना – सुहास शिरसाट (भाजप)
नाशिक – गोकुळ गीते (अपक्ष)
भंडारा-गोंदिया – अविनाश ब्राह्मणकर (भाजप)
सांगली-सातारा – धैर्यशील कदम (भाजप)
परभणी-हिंगोली – सईद खान (शिवसेना)
सोलापूर – राजेंद्र राऊत (भाजप)
धाराशिव-लातूर-बीड – बसवराज पाटील (भाजप)
नागपूर – राजीव पोतदार (भाजप)
जळगाव – नंदकिशोर महाजन (भाजप)
अमरावती – प्रवीण पोटे (भाजप)
नांदेड – अमर राजूरकर (भाजप)
या निकालांमधून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये महायुतीचे वर्चस्व कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. 17 पैकी 16 जागांवर महायुती समर्थित उमेदवार विजयी झाले असून सांगली-सातारातील विजयाने भाजपने आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.