पुण्यात फूड डिलिव्हरीच्या नावाखाली धक्कादायक कांड उघड; रात्रीच्या अंधारात बॅग उघडताच पोलिसांना धक्का


पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात ऑनलाइन फूड डिलिव्हरीच्या आडून धक्कादायक रॅकेट सक्रिय असल्याचे समोर आले आहे. वाकड परिसरात गुरुवारी (18 जून) रात्री पावणे नऊच्या सुमारास पोलिसांनी एका फूड डिलिव्हरी बॉयला रंगेहात पकडले. त्याच्या बॅगची झडती घेतल्यानंतर पोलिसांना मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सापडल्याने खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निसार अकबर मुजावर (वय 28) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो ऑनलाइन फूड डिलिव्हरीचे काम करत असून, वाकड परिसरातील एका मोकळ्या मैदानात संशयास्पदरीत्या थांबलेला होता. प्राथमिक तपासात तो ड्रग्ज विक्रीसाठी ग्राहक शोधत असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले असता, त्याच्याकडून सुमारे 8.6 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) पावडर, ज्याची किंमत दीड लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे, या प्रकरणात एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

या घटनेनंतर रात्री-अपरात्री घरपोच अन्न मागवणाऱ्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपी नेमका कोणासाठी काम करत होता आणि त्याला हा अमली पदार्थांचा साठा कुठून मिळाला, याचा सखोल तपास वाकड पोलीस करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!