युद्ध थांबताच सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी! खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचा लेटेस्ट दर


नवी दिल्ली : लग्नसराईचा हंगाम, वाढती मागणी आणि जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम म्हणून आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींनी नवा उच्चांक गाठला आहे. सोमवार (15 जून) रोजी मल्टी कमोडिटी एक्स्चेंज वर दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली.

आठवड्याच्या सुरुवातीलाच सराफा बाजारात खरेदीदारांची प्रचंड गर्दी आणि गुंतवणूकदारांचा कल पाहायला मिळाला. बाजारात व्यवहार सुरू होताच सोन्याच्या दराने मोठी झेप घेतली. एमसीएक्सवर ऑगस्ट महिन्याचे सोन्याचे वायदे १.८२ टक्क्यांच्या प्रचंड वाढीसह व्यवहार करत आहेत.

या वेगवान तेजीमुळे सोन्याच्या किमतीत एकाच दिवसात प्रति १० ग्रॅम तब्बल ₹२,७४२ ची दरवाढ नोंदवली गेली. या अभूतपूर्व वाढीनंतर सोन्याचा भाव ₹१,५३,२७०.०० या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे.

सोन्यापेक्षाही अधिक वेगाने चांदीच्या किमती आज वधारल्या आहेत. औद्योगिक क्षेत्रातील मागणी आणि लग्नसराईमुळे चांदीमध्ये मोठी तेजी दिसून आली. जुलै महिन्याचे चांदीचे वायदे आज २.५४ टक्क्यांच्या वाढीसह व्यापार करत आहेत.

चांदीच्या दरात एकाच दिवसात प्रति किलो तब्बल ₹६,२४२ ची ऐतिहासिक वाढ झाली आहे. या मोठ्या दरवाढीनंतर आता चांदीचा प्रति किलोचा भाव थेट ₹२,५२,४२८.०० या सर्वोच्च पातळीवर : लग्नसराईचा हंगाम, वाढती मागणी आणि जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम म्हणून आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींनी नवा उच्चांक गाठला आहे.

सोमवार (15 जून) रोजी मल्टी कमोडिटी एक्स्चेंज वर दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली.पोहोचला आहे, ज्यामुळे चांदी खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.

तज्ज्ञांच्या मते, देशभरात सुरू असलेल्या लग्नसराईमुळे दागिन्यांची मागणी वाढली आहे. त्याचबरोबर जागतिक बाजारात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला मिळत असलेले महत्त्व आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून सुरू असलेली खरेदी यामुळेही दरांना आधार मिळत आहे.

सराफा बाजारातील या तेजीनंतर सोने-चांदी खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. आगामी काळात जागतिक घडामोडी आणि मागणीचा कल लक्षात घेता किमतींमध्ये आणखी चढ-उतार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!