तुकाराम मुंढेंचा दणका! आता वडापाव व्यावसायिकांची खैर नाही; नियम मोडणाऱ्यांवर होणार कडक कारवाई..


मुंबई : मुंबईची ओळख बनलेल्या वडापावबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील एका प्रसिद्ध वडापाव विक्रेत्याकडून खाद्यपदार्थ पॅक करण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर केला जात असल्याचे उघड झाल्यानंतर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI) आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेने संयुक्त कारवाई केली आहे.

या घटनेनंतर FSSAI ने सर्व खाद्यपदार्थ विक्रेते, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, फेरीवाले आणि क्लाउड किचन्ससाठी नवे आणि कठोर निर्देश जारी केले आहेत. अन्नपदार्थांचा थेट संपर्क येईल अशा कोणत्याही कामासाठी वर्तमानपत्राचा वापर पूर्णपणे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अन्न सुरक्षा आणि मानके (पॅकेजिंग) नियम, 2018 नुसार अन्न साठवणे, गुंडाळणे किंवा वाढण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर करण्यास कायद्याने मनाई आहे. वर्तमानपत्रावरील शाई आणि रसायने अन्नात मिसळून आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशारा तज्ज्ञांकडून वारंवार दिला जातो.

कोणाला लागू आहेत हे नियम?

रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते आणि फेरीवाले
हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि QSR
क्लाउड किचन्स आणि केटरर्स
किरकोळ खाद्यपदार्थ विक्रेते
वर्तमानपत्राचा वापर कुठे केला जातो?
वडा, भजी, समोसे यांसारख्या तळलेल्या पदार्थांतील अतिरिक्त तेल शोषण्यासाठी
खाद्यपदार्थ झाकून ठेवण्यासाठी
पार्सल पॅकिंगसाठी
फूड-ग्रेड साहित्य वापरणे बंधनकारक

FSSAI ने स्पष्ट केले आहे की, अन्नपदार्थांच्या साठवणूक, विक्री आणि वितरणासाठी केवळ मान्यताप्राप्त फूड-ग्रेड पॅकेजिंग साहित्याचा वापर करणे बंधनकारक आहे. तसेच ग्राहकांनीही अशा प्रकारांबाबत सतर्क राहून तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 अंतर्गत नियमांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी FSSAI आणि राज्य अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त मोहीम सुरू केली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!