प्लॅस्टिकच्या बदल्यात पुणे महापालिकेने तयार केला रस्ता आणि 1600 टी शर्ट, ठरली देशातील पहिली महापालिका


पुणे : सध्या प्लॅस्टिकमुळे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. असे असताना पुण्यात पर्यावरण नुकसानीबाबत जनजागृतीसाठी प्लॅस्टिक बॉटल संकलन स्पर्धा घेण्यात आली होती. यामुळे मोठा फायदा झाला आहे.

यामध्ये पुणेकरांनी तब्बल २६ टन प्लॅस्टिकच्या बॉटल जमा केल्या होत्या. त्यातील तब्बल १० टन प्लॅस्टिक रस्त्यांसाठी वापरले जाणार आहे. यात १६ टन प्लॅस्टिकच्या मोबदल्यात महापालिकेस प्लॅस्टिकचा वापर करून तयार करण्यात आलेले तब्बल १,६०० टी शर्ट प्रत्येकी २५० रुपयांना मिळणार आहेत.

अशा प्रकारे प्लॅस्टिकचा वापर करणारी पुणे ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे. यामुळे प्लास्टिकची योग्य विल्हेवाट लागणार आहे.

दरम्यान, या स्पर्धेत पुणेकरांनी सुमारे २६ टन बॉटल संकलित केल्या होत्या. आधी त्याचे म्युरल करून ते शहरात लावण्याचा निर्णय झाला होता. मात्र, बाटल्यांची संख्या जास्त असल्याने महापालिकेने त्यातील १० टन प्लॅस्टिक रस्ते दुरुस्तीसाठी वापरण्याचा निर्णय घेतला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!