राष्ट्रवादी कर्नाटकात खातं खोलणार?, निपाणीतून उत्तम पाटील आघाडीवर..

कर्नाटक : कर्नाटक विधानसभेचे कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. असे असताना आता निपाणीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तम पाटील आघाडीवर आहे.
दरम्यान, महाराष्ट्र एकीकरण समितीचा एकही उमेदवार आघाडीवर नाही. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आघाडीवर आहेत. रामनगरातील चन्नापटना विधानसभा मतदारसंघातून कुमारस्वामी पिछाडीवर आहेत.
कनकापुरा मतदारसंघातून काँग्रेसचे डीके शिवकुमार आघाडीवर आहेत. हुबळी धारवाडमध्ये मतदारसंघातून काँग्रेस नेते जगदीश शेट्टर पिछाडीवर आहेत. यामुळे कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कर्नाटकातील मराठी बहुल परिसरातील सहा जागांपैकी 3 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. सध्या काँग्रेसने आघाडी घेतली असून आता अंतिम निकाल काय हाती येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Views:
[jp_post_view]