बेपत्ता पियुष शिंदेला माजुरड्या हार्डवेअर मालकाची अमानुष मारहाण; लाठ्यांनी व पायानी कोवळ्या जिवाला तुडविले ; कारवाई करण्यासाठी पोलिसांची तक्रारीची वाट…

उरुळी कांचन : नायगाव फाटा येथून मागील सहा दिवसांपासून बेपत्ता झालेल्या सोळा वर्षीय पियुष शिंदे या अल्पवयीन मुलाला चोरी केल्याचा संक्षय घेऊन थेऊर फाटा (ता.हवेली) येथील एका हार्डवेअर दुकानदाराने लाठ्या काठ्यांनी आमानुष मारहाण केली असल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरी केल्याचा संक्षय घेऊन हार्डवेअर मालकाने मानवी कृत्याला लाजवेल अशा

अमानुषपणे या लहानग्या जिवाला बेदम मारहाण केल्याने या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होताच संतापाची लाट उसळली आहे. लहानग्या जिवावर अशा बेमाणूसपणे हात उगारणाऱ्या हार्डवेअर मालकाची चौकशी करुन या अल्पवयीन मुलाच्या बेपत्ता होण्यास जबाबदार आहे काय ? म्हणून तपास करण्याची मागणी होऊ लागली आहे.
पियुष शिंदे हा अल्पवयीन बेपत्ता होण्यापूर्वी काही दिवसांपूर्वी थेऊर फाटा (ता.हवेली )येथील हार्डवेअर मालकाने या मुलाला चोरीच्या संक्षयाने बेदम मारल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. दुकान मालक अतिशय अमानुष पणे या मुलाला लाठी काठ्यांनी पायाने तुडवत मारहाण करीत अंगावर शहारे आणण्यापर्यंत मारहाण करीत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. दुकानात डांबून मानवी कौर्याला लाजवेल अशा पध्दतीने हा माजोरडा दुकान मालक या अल्पवयीन मुलावर काठ्या मारीत आहे. अशापध्दतीने मानवी विकृतीचा कहरच या मारहणीच्या घटनेत l निदर्शनास येऊ लागल्याने नागरीकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या अबलाधारी बालकाने ‘दयेची याचना करुन मी चोरी केली नसल्याची’ वणवणी करुनही या राक्षसी मानसाने मारहाणीचा कहर ढासळविल्याने या घटनेमुळे संताप वाढला आहे.

पियुष बेपत्ता होण्यापूर्वी दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडल्याने मारहाण झाल्यानंतर या मुलगा दडपणात होता काय? मारहाणीचा तीव्र धास्तीने या कोवळ्या मुलाने दडपण घेतले काय की, या मुलाला चोरीची नुकसान भरपाई माघितली म्हणून छळ झाला काय ? अशा माणसिक धक्कातून मुलगा भयभीत झाला काय म्हणून मुलगा दडपणात आला काय ? असा संक्षय निर्माण झाला आहे. त्यामुळे मुलगा बेपत्ता होण्यात दुकानदाराची भिती कारणीभूत आहे काय म्हणून तपास होणे गरजेचे आहे. दरम्यान अल्पवयीन मुलाला चोरीच्या संक्षयातुन इतक्या

मोठ्या प्रमाणात मारहाण झाल्याने दुकानदाराला कायदा हातात घेण्याची परवानगी दिली कोणी ?असा थेट सवाल उपस्थित होत असून गरीबांना आपल्या मर्जीप्रमाणे राबवून त्यांच्यावर अत्याचार करण्याची या दुकानमालकाला परवानगी दिली कोणी असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र पसरून
लोणीकाळभोर पोलिसांनी दुकानदार मालकावर कारवाईची दिरंगाई दाखविल्याने श्रीमंती व गरीबीचा विरोधाभास या घटनेत प्राकर्षाने जाणवत आहे.