अशोक खरातचा काळा कारनामा आता सिनेमातून पुढे येणार, शिवसेनेच्या महिला नेत्या साकारणार रुपाली चाकणकरांची भूमिका?

नाशिक : येथील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण समोर आलं आणि अख्खा महाराष्ट्र हादरला. याप्रकरणी अनेक धक्कादायक नावे समोर आली. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकरांचं नाव समोर आलं. अनेक महिलांना अंधश्रद्धेच्या गर्तेत लोटून ओरबाडणाऱ्या अशोक खरातला अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणातील अनेक आक्षेपार्ह्य व्हिडीओ समोर आलेत. आता अख्खा महाराष्ट्र हादरवणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरातच्या काळ्या कृत्यांवर सिनेमा येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या सिनेमात रुपाली चाकरणकरांच्या भूमिकेत शिवसेना नेत्या आणि सुप्रसिद्ध अभिनेत्र झळकणार असल्याचं बोललं जात आहे.
या सिनेमात अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सैयद या रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत झळकण्याची शक्यता आहे. स्वतः दीपाली सैयद यांनी एका वृत्तावाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना हा खुलासा केला. नाशिकमधील वादग्रस्त भोंदू बाबा अशोक खरात यांच्या कथित गैरकृत्यांवर आधारित एक नवा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या सिनेमात आपण एका अत्यंत महत्त्वाच्या राजकीय भूमिकेत असल्याची पुष्टी केली आहे. तेव्हापासूनच दीपाली सय्यद रुपाली चाकणकरांची भूमिका साकरणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. हा सिनेमा केवळ एका व्यक्तीच्या कथित कृत्यांपुरता मर्यादित न राहता सामाजिक आणि राजकीय पैलूंवरही प्रकाश टाकणार असल्याचं बोललं जात आहे.

अशोक खरात यांच्यावर अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचे आरोप करण्यात आले असून, या प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. अनेक महिलांसोबत त्याचे शोषण करतानाचे विडिओ देखील समोर आले होते. यामध्ये अनेक राजकीय नेत्यांची देखील नावे समोर आली होती. यामुळे मोठी खळबळ उडाली होती.