सत्याचा विजय! जे लोक घटनाबाह्य म्हणत होते त्यांना…!! निकालावर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांचे लक्ष लागलेला सत्तासंघर्षाचा निकाल अखेर समोर आला आहे. हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी अनुकूल आहे. यावर आता शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, अनेक लोक आम्हाला घटनाबाह्य, बेकायदेशीर म्हणत होते आणि स्वतःची पाठ थोपटत होते. पण न्यायालयाने त्यांना चपराक लगावली आहे. त्यांनाच कालबाह्य केले आहे.
अपेक्षित असलेला निकाल लागल्याबद्दल शुभेच्छा. अखेर सत्याचा विजय झाला. सर्वोच्च न्यायालयात निकाल पाहिलात. त्यात कायदेशीर तांत्रिक बाबींचा उल्लेख आहे. खरे म्हणजे मी सांगत होतो लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. देशात संविधान आहे. कायदा आहे, नियम आहे, त्याच्या बाहेर कुणाला जाता येणार नाही.

आम्ही सरकार स्थापन केले ते पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत बसून, सगळ्या बाबींची पूर्तता करून सरकार स्थापन झाले. बहुमताचे सरकार स्थापन झाले. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
त्यामुळे अनेक लोक याआधी, घटनाबाह्य सरकार, बेकायदेशीर सरकार म्हणत समाधान करत होते पाठ थोपटत होते. पण त्यांना न्यायालयाने चपराक दिली आहे. त्यांना कालबाह्य केले आहे.
शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केले. खऱ्या अर्थाने राजकीय पक्ष व विधिमंडळ पक्ष याबद्दलही भाष्य केले. आम्ही जो निर्णय घेतला. त्यावर निवडणूक आयोगानेही आम्हाला मान्यता दिली, असेही शिंदे म्हणाले.