लेखी परीक्षा नाही, मुलाखत नाही! रेल्वेत बंपर भरती; कोणाला मिळणार संधी?


पुणे : रेल्वेमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदांसाठी तब्बल १,१९१ जागांची भरती जाहीर करण्यात आली असून विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत होणार नाही. दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना थेट गुणवत्ता यादीच्या आधारे निवड केली जाणार आहे.

एसईसीआर रेल्वे रिक्रूटमेंट सेल, बिलासपूरकडून ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. अर्ज प्रक्रिया १२ मे २०२६ पासून सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांना ११ जून २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.

या भरतीमध्ये उमेदवारांची निवड पूर्णपणे गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाणार आहे. दहावीमध्ये किमान ५० टक्के गुण आणि संबंधित ट्रेडमधील आयटीआय गुणांची सरासरी लक्षात घेऊन मेरिट लिस्ट तयार केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना पुढील टप्प्यात कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीसाठी बोलावण्यात येणार आहे.

भरतीमध्ये फिटर, वेल्डर, टर्नर, इलेक्ट्रीशियन, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA), स्टेनोग्राफर (हिंदी/इंग्रजी), डिझेल मेकॅनिक, सुतार यांसह विविध ट्रेडचा समावेश करण्यात आला आहे. संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

अर्जदारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून किमान ५० टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित ट्रेडमध्ये एनसीव्हीटी किंवा एससीव्हीटी मान्यताप्राप्त आयटीआय प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम apprenticeshipindia.gov.in या पोर्टलवर नोंदणी करावी. त्यानंतर secr.indianrailways.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन SECR RRC बिलासपूर अप्रेंटिस भरती २०२६ लिंकद्वारे अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!