गॅस सिलेंडरच्या किमती अपडेट; घरगुती आणि व्यावसायिक दर पाहूनच करा बुकिंग…


पुणे : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी चढ-उतार सुरू असतानाच देशांतर्गत बाजारात एलपीजी सिलेंडरचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. तेल कंपन्यांनी सर्वसामान्यांना काहीसा दिलासा देत घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. मात्र, व्यावसायिक सिलेंडरच्या वाढलेल्या किमतीमुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि छोट्या व्यावसायिकांवर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल १०५ डॉलरच्या आसपास पोहोचला असतानाही, भारतीय तेल कंपन्यांनी १४.२ किलो घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर स्थिर ठेवले आहेत. राजधानी नवी दिल्लीमध्ये घरगुती सिलेंडर ₹९१३ रुपयांवर कायम आहे.
मात्र, १९ किलो व्यावसायिक सिलेंडरच्या दरांनी ३ हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या तब्बल ₹९९३ रुपयांच्या वाढीनंतर

व्यावसायिक सिलेंडरचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. त्यामुळे हॉटेल, खानावळ आणि फूड व्यवसायिकांचे गणित पूर्णपणे बिघडले आहे.

देशातील विविध शहरांमध्ये घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरचे दर वेगवेगळे आहेत. मुंबईमध्ये घरगुती सिलेंडर ₹९१२.५० तर व्यावसायिक सिलेंडर ₹३,०२४ दराने मिळत आहे. कोलकात्यात हे दर अनुक्रमे ₹९३९ आणि ₹३,२०२, चेन्नईमध्ये ₹९२८.५० आणि ₹३,२३७ इतके आहेत.

याशिवाय हैदराबादमध्ये व्यावसायिक सिलेंडर ₹३,३१५, पाटण्यात ₹३,३४६.५० तर भुवनेश्वरमध्ये ₹३,२३८ दराने विकला जात आहे. अनेक शहरांमध्ये व्यावसायिक सिलेंडरचे दर ३ हजारांच्या पुढे गेल्याने छोट्या उद्योजकांचे बजेट कोलमडले आहे.

दरम्यान, ५ किलो एफटीएल सिलेंडरच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये हा सिलेंडर ₹५४९ वरून थेट ₹८५०.५० पर्यंत पोहोचल्याने विद्यार्थी आणि स्थलांतरित कामगारांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे.

मध्यपूर्वेतील तणाव आणि जागतिक पुरवठा साखळीवरील परिणामामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे आवाहन केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती अशीच कायम राहिल्यास जून महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ४० ते ५० रुपयांची वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!