हडपसर ते यवत उन्नत मार्गातील बेकायदा नॅचरल गॅस कंपनीचे वाहिनी टाकण्याचे काम थांबवा; महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाचे निर्देश….


उरुळीकांचन : हडपसर ते यवत दरम्यान इलिव्हेटेड उन्नत महामार्ग विकसित होणाच्या आधीच पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पंधरा नंबर,हडपसर ते सोरतापवाडी पर्यंत राष्ट्रीय महामार्ग सेवा हद्दीत अनधिकृत व बेकायदेशीरपणे टाकण्यात येणारी महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीची पाईपलाईनचे काम तातडीने थांबविण्याचा सूचना महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ अधिक्षक अभियंता प.प्रा.बनगोसावी यांनी दिल्या आहेत.

महाराष्ट्र नॅचरल गॅस लि. कंपनीची सीएनजी पेट्रोल पंपाला ऑनलाईन नैसर्गिक गॅस पुरवठा करण्यासाठी कंपनीकडून पंधरा नं. हडपसर ते सोरतापवाडीपर्यंत खोदकाम करुन वाहिनी टाकण्याचे काम सुरू असल्याच्या तक्रारी पायाभूत सुविधा विकास महामंडळाला प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार या प्राधिकरणाने स्थानिक पाहणी केली असता नॅचरल गॅस कंपनीकडून कुंजीरवाडी ते थेऊर फाटा हद्दीत राष्ट्रीय महामार्गालगत काम सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.

या कंपनीकडून यवत ते हडपसर दरम्यान राष्ट्रीय महामार्ग विकासासाठी हस्तांतरीत झालेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून कसल्याही प्रकारची खोदकाम करुन वाहिनी टाकण्याची परवानगी घेतली गेली नसल्याचे निदर्शनास आल्याने राज्य पायाभूत सुविधा महामंडळाकडून तात्काळ या बेकायदा खोदकामाची दखल घेऊन तातडीने काम थांबविण्याचे आदेश नॅचरल गॅस कंपनी व लोणीकाळभोर पोलिसांना देण्यात आले आहे. त्यासाठी लेखी पत्र काढण्यात आले असून वाहिनी टाकण्याचे काम थांबविणे व स्वखर्चाने हस्तांतरीत करणे असे आदेश काढण्यात आले आहे.

दरम्यान महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाकडून हडपसर ते यवत या दरम्यान महामार्ग विकसित करण्याची जबाबदारी आहे. या दरम्यान महामार्ग विकसित करण्यासाठी हा मार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने टेंडर प्रक्रिया राबविली असून मेसर्स मेंन्टेकार्लो कंपनीला या रस्ता विकासाचे काम बिओटी तत्वावर देण्यात आले आहे. सद्यस्थितीत या कंपनी व रस्ते विकास महामंडळाकडून सर्व्हेक्षणाचे काम चालू आहे.

त्यानंतर दोन महिन्यांत हे काम प्रत्यक्ष सुरू होण्याची शक्यता असल्याने या महामार्गावरील सुरक्षितेच्या उपाय योजनांचा आढावा सुरू असून त्यादृष्टीनेसुरू असलेल्या कार्यवाहीत व प्राप्त तक्रारीत हे बेकायदा काम सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!