मुंबई- पुणे मिसिंग लिंकवर पहिलाच भीषण अपघात! टेम्पो आणि बसच्या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू, चार जण गंभीर जखमी..


पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ परिसरात भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई पुणे महामार्गावर बसची 3 खाजगी वाहनांना जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

या भीषण अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले असून 2 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला असून वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. मिसिंग लिंक मार्ग सुरू झाल्यानंतर वाहतूक वेगवान झाली असली तरी अतिवेग आणि निष्काळजी यामुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

महामार्गावर वाहतूक कोंडी बघता दुसऱ्या लेनवरून वाहने सोडण्यात आल्याची माहिती आहे. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून मिसिंगलिंक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांकडून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असून मृतांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पघातातील वाहने बाजूला करण्यात पोलिसांना उशिरा यश आले असून मुंबई पुणे महामार्गावर मिसिंगलिंक वर सलग 2 अपघात घडले होते. अपघातग्रस्त वाहनात अडकलेल्या नागरिकांना हेल्प फाउंडेशन या बचाव टीमकडून गॅस कटरच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते.

मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवरील टेम्पो आणि बस अपघातानंतर चारही लेन खुल्या करण्यात आल्या आहेत. अडकून पडलेली वाहने तीन लेनवरून सुरू करण्यात आली आहे. मिसिंग लिंक मार्ग सुरू झाल्यानंतर वाहतूक वेगवान झाली असली तरी अतिवेग आणि निष्काळजी यामुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!