मुंबईत मोठा राडा! राजू शेट्टी यांना फरफटत नेलं, जानकारांना उचलून नेलं, शेतकरी आंदोलनातील प्रकार..


मुंबई : मुंबईत आज शेतकरी आंदोलनादरम्यान मोठा राडा बघायला मिळाला. यावेळी कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी माजी खासदार आणि शेतकरी नेते राजू शेट्टी तसेच माजी मंत्री महादेव जानकर यांनी आंदोलन केले. मात्र त्यांना ओलिसांनी ताब्यात घेतल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला.

यावेळी राजू शेट्टी यांना फरफटत तसेच जानकर यांना पोलिसांनी उचलून नेले. यावेळी राजू शेट्टी यांनी पोलिसांवर तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या वर्षी कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसून आलं. त्यावर सरकारने त्यांना केवळ 22 हजारांची मदत जाहीर केली. त्यानंतर काजू आणि आंबा उत्पादक शेतकरी आक्रमक होत त्यांनी मुंबईत आंदोलन केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीसफाटा तैनात करण्यात आला होता.

यामध्ये शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शेकापचे जयंत पाटील, शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत आणि इतर नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे आंदोलक करणारे शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून आलं. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

हे आंदोलन गिरगाव चौपाटीपासून मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा बंगल्याकडे असे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन काजू आणि आंबा उत्पादकांच्या विविध मागण्या मांडण्याचा आंदोलकांचा प्रयत्न होता. मात्र पोलिसांनी त्या आधीच आंदोलकांची धरपकड केली. यामुळे वातावरण चांगलेच तापले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!