पवार कुटुंबात नवा राजकीय ट्विस्ट! रोहित पवार काँग्रेसच्या वाटेवर? अजितदादांच्या जवळच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ


पुणे : राज्यातील राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींमुळे मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर चर्चांना उधाण आले असतानाच आता अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी मोठा दावा केला आहे.

रोहित पवार काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा सुनील शेळके यांनी केला असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. सुनील शेळके म्हणाले की, रोहित पवार २०२९ ची निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर बारामतीतून लढवण्याच्या तयारीत आहेत.

त्यांनी दिल्लीमध्ये जाऊन राहुल गांधी यांची भेट घेतली असून ते काँग्रेसमध्ये जाण्यास इच्छुक आहेत. माझं म्हणणं चुकीचं असेल तर रोहित पवारांनी पुढे येऊन स्पष्ट करावं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास ते पक्ष सोडणार नाहीत.

याचवेळी पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार उभा करण्याची मागणीही रोहित पवारांनी केल्याचा दावा शेळके यांनी केला. “रोहित पवारांनी स्वतःच्या पक्षाचं नुकसान केलं आणि आता ते दुसऱ्या पक्षात हस्तक्षेप करत आहेत,” अशी टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, यापूर्वी रोहित पवार यांनीही मोठा दावा करत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे २२ आमदारांसह भाजपमध्ये जाणार असल्याचे म्हटले होते. भाजपप्रवेशाची वेळ ठरणे बाकी असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रातून काही वरिष्ठ नेत्यांची पदे वगळल्याची बाब समोर आल्यानंतर राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद अधिकच चिघळल्याचे चित्र आहे. या सर्व घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!