‘ती’ महिला उपमुख्यमंत्री होणार? बंगालमध्ये भाजपचा मोठा मास्टरस्ट्रोक; अमित शाहांच्या बैठकीकडे देशाचं लक्ष


पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या जबरदस्त सस्पेन्स निर्माण झाला असून भाजपच्या नव्या सत्तासमीकरणाची चर्चा देशभर रंगली आहे. स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण आणि उपमुख्यमंत्री कोण? यावरून राजकीय वर्तुळात तुफान चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, राज्यात दोन उपमुख्यमंत्री देण्याचा भाजपचा मोठा प्लॅन असल्याची माहिती समोर येत आहे. त्यात एका महिला नेत्याला मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने उत्सुकता आणखी वाढली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोलकात्यात दाखल झाले असून त्यांच्या उपस्थितीत भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड होणार आहे. मुख्यमंत्रीपदासाठी शुभेंदू अधिकारी यांचं नाव सर्वात पुढे मानलं जात आहे. ममता बॅनर्जी यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेणारा आणि सलग मोठे राजकीय विजय मिळवणारा चेहरा म्हणून शुभेंदू अधिकारी यांची ओळख तयार झाली आहे. त्यामुळे बंगालच्या गादीवर त्यांचंच नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे.

मात्र खरी चर्चा उपमुख्यमंत्रीपदाभोवती सुरू झाली आहे. भाजप नेत्या अग्निमित्रा पॉल, प्रदेशाध्यक्ष सुकांत मजूमदार यांच्यासह काही मोठ्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. बंगालमध्ये महिला सुरक्षेचा मुद्दा निवडणुकीत गाजला होता. त्यामुळे महिला उपमुख्यमंत्री देऊन भाजप मोठा राजकीय संदेश देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, भाजप बंगालमध्ये उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासारखा ‘डिप्टी सीएम फॉर्म्युला’ राबवू शकते. सामाजिक, प्रादेशिक आणि जातीय समतोल साधण्यासाठी दोन उपमुख्यमंत्री नेमले जाऊ शकतात. मतुआ आणि चंद्रवंशी समाजालाही प्रतिनिधित्व देण्यावर पक्षाचा भर असल्याची चर्चा आहे.

आज होणाऱ्या भाजप आमदार दलाच्या बैठकीनंतर बंगालच्या नव्या सत्तेचं चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र ‘ती’ महिला नेता नेमकी कोण? आणि भाजपचा अंतिम मास्टरस्ट्रोक काय असेल? याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!