मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय! ९ नोव्हेंबरला शासकीय सुट्टी जाहीर, नेमकं कारण काय?

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सोमवारी, ९ नोव्हेंबर रोजी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांमध्ये स्थानिक शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयानंतर यासंदर्भातील अधिकृत परिपत्रकही प्रसिद्ध करण्यात आले आहे.

शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संघटनांकडून या सुट्टीची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे. परिपत्रकानुसार, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य सरकारी तसेच निमशासकीय कार्यालये सोमवारी बंद राहणार आहेत.
ही स्थानिक सुट्टी शासन निर्णय क्रमांक पी अॅन्ड एस. नंबर पी-१३/||/बी, दिनांक ५ नोव्हेंबर १९५८ मधील तरतुदींनुसार जाहीर करण्यात आली आहे. या आदेशाची अंमलबजावणी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यापुरतीच मर्यादित असेल.

काय काय बंद राहणार?

सरकारने जाहीर केलेली ही सुट्टी केवळ मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी लागू आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांतील राज्य शासकीय आणि निमशासकीय कार्यालये सोमवारी बंद राहतील. या निर्णयासंदर्भातील परिपत्रक शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात आले आहे.
