पश्चिम बंगालमध्ये मोठा गोंधळ; मतमोजणी प्रक्रिया तात्पुरती रोखली, तणावाचे वातावरण…

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणूक मतमोजणीदरम्यान मोठा गोंधळ निर्माण झाला असून काही ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आली आहे.

मतमोजणी केंद्रांबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली असून, काही ठिकाणी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे प्रशासनाला परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हस्तक्षेप करावा लागला.
दरम्यान, राज्यात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून निवडणूक आयोगाने सर्व केंद्रांवर शांतता राखण्याचे निर्देश दिले आहेत. काही भागांमध्ये ईव्हीएम आणि मतमोजणी प्रक्रियेबाबत आक्षेप घेतल्याने परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली आहे. सध्या मतमोजणी पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, संपूर्ण निकालाकडे राज्याचे आणि देशाचे लक्ष लागले आहे.

Views:
[jp_post_view]