एकाला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न; लोणी काळभोर पोलिसांची झटपट कारवाई, २४ तासांत तिघे जेरबंद…


लोणी काळभोर : एका इसमाला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना हत्यारांसहीत २४ तासांचे आत जेरबंद करण्यात लोणी काळभोर पोलिसांनी यश मिळवले आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी सुरेश बाबुराव गायकवाड (वय १८, रा. घोरपडेवस्ती लेन नंबर १ कदमवाकवस्ती ता. हवेली जि. पुणे), कुणाल राहुल चौगुले (वय १८, रा. लेन नंबर ६, घोरपडेवस्ती, कदमवाकवस्ती) व एका अल्पवयीन मुलास अटक करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी दिनांक १८ ते २४ एप्रिल दरम्यान राबविलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत राबविण्यात आलेल्या कारवाईदरम्यान लोणी काळभोर पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी, चौकी अधिकारी, अंमलदार तसेच बीट मार्शलचे अंमलदार हे हदीत गस्त घालत असताना तपास पथकाचे अधिकारी यांना कदमवाकस्ती ग्रामपंचायत हद्दीतील टोलनाका परिसरात २ ते ३ इसम हे बेकायदेशीररित्या धारदार हत्यार जवळ बाळगून फिरत आहे. अश्या आशयाची बातमी प्राप्त झाली

बातमीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ तपास पथक अधिकारी व अंमलदार तसेच बीट मार्शल यांनी तत्परता दाखवुन बातमीच्या ठिकाणी जाऊन शोध घेऊन वरिल तिन जण मोपेड मोटरसायकल हत्यारानिशी मिळून आले.

त्यांना शिताफीने ताब्यात घेऊन चौकशी करता त्यांनी द्राक्ष संशोधन केन्द्र पुणे सोलापुर रोड येथे एका इसमास त्यांचेकडील धारदार हत्याराने वार करुन पळून जात असल्याचे सांगितले. त्या आधारे मांजरी पोलीस स्टेशन येथे अधिक माहीती घेतली असता सदर घटनेच्या अनुषंगाने जखमी इसम गणेश नवनाथ कांबळे यांचेवर उपचार चालु असल्याबाबत व गुन्हा दाखल करण्याची प्रकिया चालु असल्याचे समजले. सदर इसमांनी बेकायदेशीररित्या हत्यार जवळ बाळगल्याने त्यांचे विरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडुन लोणी काळभोर पोलीसांनी धारदार हत्यारे व मोपेड दुचाकी वाहन जप्त करुन मांजरी पोलीस स्टेशनकडे दाखल झालेला गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदरची उत्कृष्ठ कामगिरी पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ६, राजकुमार शिंदे व सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, राजेंन्द्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के, पोलीस उप निरीक्षक प्रल्हाद जगताप, तपास पथकातील अंमलदार कर्डीले, पुडे, पोलीस हवालदार चंद्रकांत माने, सागर जगदाळे, बीट मार्शल चे पोलीस अंमलदार दिपक गायकवाड व निखील मेमाणे यांनी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!