भावाचा मित्रच ठरला हैवान; चाळीसगावात अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणाने खळबळ..

जळगाव : चाळीसगाव तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी हा पीडितेच्या भावाचा मित्र असून नात्याने चुलत काका लागतो. घरातील ओळखीचा गैरफायदा घेत त्याने मुलीशी मैत्री करून तिचा विश्वास संपादन केला.
यानंतर आरोपीने पीडितेसोबत काढलेल्या छायाचित्रांचा वापर करून तिला धमकावले आणि दबाव टाकत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच, आरोपीने काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याचीही माहिती समोर आली आहे.

या प्रकारानंतर घाबरलेल्या पीडितेने कुटुंबीयांच्या मदतीने चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

Views:
[jp_post_view]