रेशन कार्डधारकांना रॉकेल किती रुपये दराने मिळणार? महत्वाची माहिती आली समोर…


पुणे : गेल्या महिन्यापासून सुरू असलेल्या इराण -इस्राईलच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सरकारने गॅस तुटवडा होऊ नये म्हणून रेशन कार्डधारकांना रॉकेल देण्याचा निर्णय घेतला होता. या युद्धविरामाच्या घोषणेनंतर आता सुमारे 62 रुपये प्रति लिटर या दराने रॉकेल उपलब्ध होणार असल्याची माहिती समोर आली आहे.या रॉकेल पुरवठ्यासाठी जिल्ह्यात तीन घाऊक विक्रेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यासाठी 2 लाख 4 हजार लिटर रॉकेलचा कोटा निश्चित करण्यात आला आहे.जिल्हा प्रशासनाने तालुकानिहाय रॉकेलचा कोटा निश्चित केला आहे. यामध्ये बारामती तालुक्याला सर्वाधिक 33 हजार लिटर रॉकेल देण्यात येणार आहे, तर इंदापूर तालुक्यासाठी 27 हजार लिटरचा पुरवठा होणार आहे.उपलब्ध कोटा मर्यादित असल्यामुळे नगरपालिका क्षेत्र वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्याच्या परिस्थितीत सर्व लाभार्थ्यांना रॉकेल देणे शक्य नसल्याने केवळ अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनाच याचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गरजू कुटुंबांना प्राधान्य देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.रॉकेलची विक्री शिधापत्रिकेद्वारेच केली जाणार आहे.

दरम्यान राज्य सरकारच्या निर्देशानुसार कमिशनसह सुमारे 62 रुपये प्रति लिटर या दराने रॉकेल उपलब्ध होणार आहे.त्यामुळे केवळ ग्रामीण भागातील अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनाच रॉकेलचा लाभ मिळणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!