कल्पना खरात सरेंडर होणार?’लुकआऊट’ नोटीस जारी केल्यानंतर अटकेच्या भीतीनं उचललं मोठं पाऊल

पुणे: नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्याची पत्नी कल्पना खरात एसआयटीने चौकशीचा फास आवळताच फरार झाली आहे. ती फरार झाल्यामुळे तिचा खरातच्या काळ्या कारनाम्यामध्ये मोठा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात असतानाच आता अटकपुर्व जामीनासाठी तिने अर्ज दाखल केल्याच समोर आलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्याची खडानखडा माहिती तिची पत्नी कल्पना खरात हिला होती. पण पोलिसांनी तिला वेळीच ताब्यात घेतले नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. या सवलतीचा फायदा घेत ती फरार झाली.तिने पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे ती स्वतःहून सरेंडर होण्याची शक्यता कमी आहे. तिने चार एप्रिलला न्यायालयात जामीन्यासाठी अर्ज दाखल केला आहे.
दरम्यान पोलिसांच्या चौकशीला सामोरे जाऊ लागू नये आणि खरात प्रकरणात पोलिसांपासून संरक्षण मिळावे यासाठी कल्पना खरात ही अगोदरच गुप्त ठिकाणी पोहचली आहे. पोलीस आपल्यापर्यंत पोहचणार याची कुणकुण लागताच खरातची पत्नी यंत्रणांच्या हातावर तुरी ठेवत पळाली. आता तिने राहता न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे.

दरम्यान या अर्जावर 10 एप्रिल रोजी पहिली सुनावणी होणार आहे. तिला अटकपूर्व जामीन फेटाळल्यास खरातच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.खरात प्रकरणाचा तपास एका टप्प्यातच अडकल्याचे आणि राजकीय धागेदोरे शोधण्याचे काम थंडावल्याचा आरोपही विरोधक करत आहे. त्यामुळे यातून आणखीन काय माहिती पुढे येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.