सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ! 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय? स्वस्त की महाग..

पुणे : गेल्या महिन्यांपासून सुरू असलेल्या इराण आणि इस्त्राईलच्या युद्धामुळे सोन्या-चांदीच्या दरात चढउतार होताना दिसत आहेत. सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत.या दिवसात सोन्या -चांदीचा खप सगळ्यात जास्त होत असतो.मात्र घसरनींनंतर आता सोन्याच्या दरात जोरदार सुधारणा दिसून आली आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,50,930 रुपये आहे

लग्नसराईचे दिवस असल्याने सराफा बाजारात पुन्हा एकदा गुंतवणूकदारांच लक्ष या मौल्यवान धातूवर केंद्रित झाले आहे. काल चार मार्च रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर हा 1.62 लाख प्रति दहा ग्राम होता.हाच दर आता घसरून 1.50 लाखाच्या आसपास आला आहे.
आज 5 एप्रिल 2026 रोजी देशात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,50,930 रुपये आहे. तर 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,38,350 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती सातत्याने बदलत आहेत.
आजच्या घडीला चांदीच्या दरात ही मोठी उलथापालथ झाली आहे. आता तो दर 2 लाख 35 लाखापर्यंत खाली आला आहे. म्हणजे चांदीत 35 हजार रुपयांची घसरण झाली आहे. मागील महिन्याचा म्हणजेच मार्च महिन्यात सोन्याचा दर हा 12 हजारानीं कमी झाला होता.पण या महिन्यात हा दर पुन्हा वाढेल अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

फक्त एका आठवड्यात दहा ग्राम सोन्याच्या किमतीत 3666 रुपयांची वाढ झालेली आहे. त्यामुळे दहा ग्रॅम सोनं 1. 47 लाखावर गेला आहे. या सोन्या-चांदीच्या चढत्या आणि उतरत्या दराचा अधिक फटका सर्वसामान्यांना बसत आहे.