प्रेमात घात! ‘ मी तुझ्याशी लग्न करेन ‘ प्रेयसीला दाखवलं आमिष, नंतर बॉयफ्रेंडचा स्पष्ट नकार अन् तरुणींन संपवलं…


पुणे: अलीकडच्या काळात तरुण-तरुणींच्या प्रेम संबंधातून लग्नाचे खोटं आमिष दाखवून फसवणुकीच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. अशातच आता पुण्यातील एका तरुणीने बॉयफ्रेंडने लग्नाचं आमिष दाखवून नंतर नकार दिल्यानं आणि मानसिक छळ केल्यामुळे टोकाचं पाऊल उचललं आहे.तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चाकणमध्ये घडली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पूजा मेश्राम असे मृत तरुणीचे नाव आहे. ती मूळची नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील आहे. कामानिमित्त ती चाकण परिसरात वास्तव्यास होती. तेथील एका खाजगी कंपनीत ती कामाला जात होती.प्रियकर करण टोंगारिया
आणि तिच्यामध्ये य गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध होते. सोशल मीडियावर त्यांची ओळख झाली आणि पुढे त्याचं रूपांतर प्रेमात झाल्याचं समोर आलं आहे. मात्र, पूजाने जेव्हा लग्नासाठी विचारणा केली, तेव्हा करणने तिला स्पष्ट नकार दिला.

इतकेच नव्हे तर, या कारणावरून त्याने पूजाचा प्रचंड मानसिक छळ करण्यास सुरुवात केली.प्रियकराकडून सतत होणाऱ्या या मानसिक त्रासाला आणि फसवणुकीला कंटाळून पूजाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पूजाच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी प्रियकर करण टोंगारिया (रा. करोलबाग, नवी दिल्ली) याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.चाकण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!