आता मुंबईत भोंदूबाबाचा नवीन प्रताप सुरू!’अल्पसंख्याक’ बाबाकडून आई व मुलीला केलं विवस्त्र …!


मुंबई : लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या आरोपाखाली अटकेत असलेला नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातबाबत धक्कादायक खुलासे समोर येत असतानाच आता मुंबईतील अल्पसंख्याक भोंदू बाबाचा घाणेरडा प्रताप समोर आला आहे.त्याने काळ्या जादूच्या बहाण्याने आईला आणि मुलीला फार्महाऊसवर मध्यरात्री बोलवून महिलांना विवस्त्र होण्यास भाग पाडले.तसेच विरोध केल्यास जादूटोणा आणि जीवे मारण्याची धमकी देत आरोपी अत्याचार करत असल्याचा आरोप आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,कळंबोली परिसरातील अब्दुल रशीद उर्फ ‘बाबाजान’ या भोंदूबाबाने काळी जादू करण्याच्या बहाण्याने मुलीवर आणि तिच्या आईवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे.बाबाजान हा आध्यात्मिक व तत्त्वज्ञानाचे गोड बोलून ज्ञान सांगत लोकांचा विश्वास जिंकायचा. ‘अल्लाचे महत्त्व’ पटवून देत, गोड बोलून किंवा काळ्या जादूची भीती दाखवून तो महिलांना आपल्या जाळ्यात ओढत असे. त्याने काळ्या जादूच्या नावाखाली आई आणि मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोन महिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून आरोपीविरोधात गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

या भोंदू बाबा विरोधात पोलिसात गुन्हे दाखल झाल्यानंतर तो कुटुंबासह फरार झाला होता. अजून पीडित महिलांच्या अत्याचाराची प्रकरणे पुढे येण्याची शक्यता असून सध्या दोन महिलांनी तक्रार दिली असली तरी आणखी अनेक महिला त्याच्या अत्याचाराच्या बळी ठरल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात पीडित महिलांना पुढे येण्यासाठी मुस्लिम सत्यशोधक मंडळाने मदत केली आहे.

दरम्यान मुंबईतील हा भोंदू बाबा लोकांकडून पैशांची उकळपट्टी करत महिलांबरोबरच अनेक पुरुषांनाही त्याने फसवले आहे.कळंबोलीतील त्याच्या घराबाहेर वाढलेल्या गर्दीमुळे सोसायटी सदस्यांनी त्याला घर सोडण्यास भाग पाडले होते. त्याच्या या अनेक कारनाम्यामुळे महिलांच्या अत्याचाराची अनेक प्रकरणे उघडकीस येतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!